Thursday, November 1, 2012

माझं लग्न (बालविवाह..एक अनिष्ट परंपरा!)

आज लिहिण्याचं कारणं म्हणजे मला जाम टेंन्शन आलं आहे..मी ऐकलयं हल्लीचे आई बाबा मुलांच्या गोष्टित नाक घालत नाहित (गर्लफ्रेंडबाबतीत तर नाहिच नाहि!) पण माझ्याबाबतीत जरा वेगळं आहे...मी आईच्या पोटात असल्यापासुन चक्क माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली...
त्याचं काय आहे ना..माझा एक काका आहे...योगेश काका!त्याची आणि बाबाची खुप घट्ट गट्टी आहे...आिण आवड सुध्दा सेम टु सेम...अगदि िटव्हि पासुन क्रिकेट पर्यंत! so..दोघांनी ठरवलंय माझं लग्न काकाच्या मुलीबरोबर करायचं!!म्हणजे त्यांना नेहमी एकत्र राहता येइल!!
पण आईला काका आवडत नाहि वाटतं...तो आणि बाबा तिला सारखे चिडवतात...िबचारी नेहाकाकू पण पिडलेली असते..
पण मला कळतं नाहि मला न िवचारता हे लोकं कसं काय माझं लग्न ठरवू शकतात...जामचं टेंन्शन येतं..पण नेहाकाकू कडे बघून थोडं कमी होतं ..atleast लुकतरी चांगला असेलं...
आई सारखी म्हणतं असते..काकूला मुलगा होवुदे किंवा आईला मुलगी..म्हणजे त्यांचा बेत फसेल!

आता बाहेर आलं कि मलाचं सगळं हँडल करावं लागेलं असं दिसतंयं...

No comments:

Post a Comment