बाबा सांगा कोणाचे..
मला वाटायचे बाबा फक्त माझ्या आईचे..
आई सांगा कोणाची..
मला वाटायचे आई तर फक्त माझ्या बाबांची..
दोघंाच्यात होते माझ्यावरून लठ्ठालठ्ठी..
आज मला आहे सांगायची!
आई माझ्याबरोबर असते २४तास अन्
बाबाला होतो या गोष्टिचा त्रास!
रात्री बाबा उशिरा येतो ..
अन आईच्या कुशीतून मला ओढून घेतो...
माझ्या प्रत्येक ओरखड्यावर असते त्याची बारिक नजर..
आणि कारण सांगायला आई असते नेहमी हजर!
बाबाला माझ्या औषधांची काळजी फार अन् आईला वाटतो तो आहे केमीकल्सचा मार..
बाबा आहे माझा स्वछतेचा भोक्ता..
अन आईला देतो माझ्या आहाराचा तक्ता..
सारे करताकरता आईच्या येते नाकिनऊ...
म्हणते पुरे झाले आता बाळाला अंकगणित शिकवु...
बाबा तिला चोरून मला टिव्हि दाखवतो आणि आईन रागवलं कि म्हणतो वेदूला डिस्कवरीवर प्राणी दाखवतो!!
पण मला बरं वाटतं नसलं कि दोघे एक होतात.. अन् एकदमचं मला आपल्या कुशीत घेतात..
आई औषध देते अन बाबा गोष्टि सांगतात..
आता बरं वाटेलं याला..दोघ एकमेकांना समजावतातं!!
बाब करतात लाडं अन् आई काळजी करते..
मग मला वाटतं आई बाबा आहेत..
फक्त नि फक्त या वेदूचे!!

No comments:
Post a Comment