Friday, November 9, 2012

BRB!!! (अर्थात हा मी आलोच!)

आता थोडे दिवसं माझ्या फॅन्सना वाट बघावी लागेल.. कारण मी आजी आजोबांकडे जात आहे..दिवाळी आणि बारशासाठि!
शेवटि एकदाचं मला फायनल नाव मिळणारं...आणि दिवाळीपण बघायला मिळणारं.. मी जाम खुश आहे!!
कालचं आईने माझ्यासाठि नवीन शेरवानी आणली आहे..फोटोपण काढले मी झोपेत असताना:(
मी काहि आधी दिवाळी बघितली नाहि पण मस्त पणत्या, लाइटच्या माळा,खाऊ या वरून नक्कीच गणपती बाप्पा सारखं काहितरी असेलं असं वाटतं..मला कोणतीहि गोष्ट आवडली कि तिचे लाड लाड करायचे असतात पण घरच्याना मी दुसऱ्या कशाचे लाड केलेल बघवत नाहि..उगाचचं वेदू तोंडात घालू नकोस म्हणून ओरडतातं..आई तर कमालचं करते.. स्वतः खाऊ खाते अन मी मागितला कि दातं नाहित दात नाहित असंकाहितरी म्हणत राहते..नेक्स्ट टाइम डॅाक्टर काकूला विचारतोच खर काय ते!
चलो जातो आईला सामान भरायला मदतं करायला हवी नाहि तर ती काहितरी विसरेलं!
सगळ्यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!!!

!!!!!HAPPY DIWALI!!!!



No comments:

Post a Comment