Tuesday, October 29, 2019

मला बाहेर यायचंयं...

तसं मम्मा तिच्या पोटात मी असताना मला इशु इशु असं सारखं म्हणायची ..माझ्यासाठी गाणं म्हणायची...बाबा पणं अधे मधे मस्ती करायचा..मला लाइट दा़खवायचा..ढीशूम ढीशूम खेळायचा...आणि माझं फेवरेट गाणं summer of 69 म्हणायचा...मग मला खुु्ुप्प्प् मज्जा यायची... एकदम नाचावसं वाटायचं.... पण मला वाटत लहान मुलांचा आनंद यांना बघवतं नसावा कारण ..मी जरा मजेत गिरकी घेतली की आई ओरडायची..सगळे घाबरायचे...आणि मग मला उगीचच झोपायला लागायचं...

माझ्या आईला तिखट आवडतं वाटतं...सारखी ितखट खायची...आणि कधीतरी माझ्या आवडीची पाणीपुरी ,भेळ,रसमलाई खायची...

मला वाटतं बाबा आईचं सगळं ऐकतो...ती जे वाढेल ते गप्प खातो..फक्त टिव्हीसाठी आई बाबाला रागवतं असते..मला जाम मज्जा येते..बाबाने मला सांगितलयं..तो मला टिव्ही दाखवेल...बघु आता आई बघुन देते का आम्हाला...

आई-बाबा काॅम्प्युटरवर काम करतात..कधीकधी घरी सुध्दा काम करतात..बाबा गेमपणं भारी खेळतो...मलापणं खेळायचा आहे...पणं हि लोकं मला बाहेरचं काढतं नाहितं. :(
एकदातरं हि लोकं मस्त खेळण्याचा माॅल मध्ये गेली...आईतर जाम खुश होती..खुप खुप खेळणी बघीतली....नेहमी प्रमाणे मला कोणतं खेळणं द्यायचं यावरं दोघानी वाद घातला..पणं एवढं सगळ करुन एकपणं खेळणं घेतलं नाहि :( मी बाहेर आल्यावर तरी हे लोकं माझ्या आवडिचं देतीलं ना याचं टेन्शन आलयं...

खुप्प दिवसं आतं रािहल्यावर आता मात्र मला जाम बोर होतयं....आणि हो त्या कॅामप्युटर,गेम,खेळणी या सार्याशी खेळायचंयं..मस्त मस्त पाणीपुरीखायचीयं.. .डॅाक्टर काका ..आई-बाबा मला बाहेर यायचंयं....





Sunday, February 3, 2019

privacy-policy

Generic Privacy Policy template


Privacy Policy


Last updated: (add date)

My Company (change this) ("us", "we", or "our") operates http://www.mysite.com (change this) (the "Site"). This page informs you of our policies regarding the collection, use and disclosure of Personal Information we receive from users of the Site.

We use your Personal Information only for providing and improving the Site. By using the Site, you agree to the collection and use of information in accordance with this policy.

Information Collection And Use

While using our Site, we may ask you to provide us with certain personally identifiable information that can be used to contact or identify you. Personally identifiable information may include, but is not limited to your name ("Personal Information").

Log Data

Like many site operators, we collect information that your browser sends whenever you visit our Site ("Log Data").

This Log Data may include information such as your computer's Internet Protocol ("IP") address, browser type, browser version, the pages of our Site that you visit, the time and date of your visit, the time spent on those pages and other statistics.

In addition, we may use third party services such as Google Analytics that collect, monitor and analyze this …

Sunday, December 9, 2012

माझी पहिली पार्टि..(take it LIGHTLY..)

आपण पार्टिला जायचे..पार्टिला जायचे असं आईकडून बरेचं वेळा ऐकलं पण पार्टि म्हणजे नेमकं काय हे काहि कळेचना..बरं पार्टित काय काय असणारं हे पण हि लोकं बोलेनातं..त्यामुळे माझा एकदम गोंधळ उडाला..मला वाटत पार्टि बारशासारखी असावी..का पार्टि म्हणजे डाॅक्टर काकूने टूच करायचा कार्यक्रम कि कायं.. का हि लोकं आत्ता पासून मला शाळेतं तरं पाठवणारं नाहित ना.. एक ना अनेक प्रश्न मला पडू लागले.. आणि कधी नाहि ती भिती वाटू लागली..
एके दिवशी माझ्यासाठी नवे शुज टोपी आणि जीन्स आणली गेली आणि वाटलं..चला टुच करण्याचा तरी हा कार्यक्रम नाहि..तरी पण शाळेचा डाऊट अजून बाकि होताच!
शेवटि तो दिवसं उजाडला..पण बाबा न्यायला आले नव्हते़..संध्याकाळी आईने गाडी बोलवली अन आम्ही दोघे निघालो..वाटेत अर्नवदादा सान्वीदिदि ला पन घेतले..ते पण मस्त मस्त ड्रेस घालून आले होते आणि दंगा करतं होते...कुणीतरी डान्स विषयी बोलत होते...चला म्हणजे पार्टि म्हणजे काहितरी गम्मत असावी..मी पण मज्जा करणार..डान्स करणारं..याहूूू!!!!!
आज पहिल्यांदा मला गाडित पुढे बसवले होते..त्यामुळे खुप मज्जा आली..रस्त्यावर गाड्या लाईट आवाज.. काय बघु नि का़य नको अस झालं..एवढ्या सगळ्यात मला झोप आली अन मी आईच्या मांडीवर ताणून दिली..
ऊठून बघतो तर काय समोर चक्क बाबा!! त्याने मला उचलले अन काहि तरी दाखवायला लागला..समोर खुप खुप लोक वेगवेगळे कपडे घालून उभी होती..काहि लोकांनी तर तोंडावर काहितरी विचित्र लावले होते..बाबा मला आता आत घेऊन गेला..आणि आत बघतो तर काय अंधार गुडूप्प!!! बाबा आईच काय मला माझ्या हातातलं खेळणं पण दिसेना..इतका अंधार तर रात्रीपण नसतो माझ्या रूममध्ये.. :(((((
मला खुप खुप भिती वाटू लागली..बाबा काहितरी दाखवू लागला ,आई काहितरी गाणं म्हणत होती पण छे मला काहिचं दिसेना.. मला कळेना हि लोकं लाईट लावायचं सोडुन असं वेड्यासारखं का करताहेतं..मी त्यांना समजावयाचा खुप प्रयत्न केला पण पुन्हा मला तिथेचं फिरवतं राहिले.. आईची तर कमालचं..चक्क मला दुध पाजायला लागली..आता मला सांगा भूक नसेल तर मी कसा पिणार????आता हळूहळू माझा पेश्नस संपायला लागले होते..ओरडून ओरडून सांगत होतो लाईट लावा लाईट पण कुणी ऐकल नाहि..आिण झालं आई बाबाने मला उचलून घरी आणले.
माझा सगळा मुड आॅफ झाला..आता मला सांगा त्या पार्टीतल्या डान्सफ्लोअर वर मला नेल असतं तरं लाईट नसती का दिसली??? आणि मला डान्स पन करायला मिळाला असता ;))) कधी कळणारं या लोकांना देव जाने!!!