Sunday, December 9, 2012

माझी पहिली पार्टि..(take it LIGHTLY..)

आपण पार्टिला जायचे..पार्टिला जायचे असं आईकडून बरेचं वेळा ऐकलं पण पार्टि म्हणजे नेमकं काय हे काहि कळेचना..बरं पार्टित काय काय असणारं हे पण हि लोकं बोलेनातं..त्यामुळे माझा एकदम गोंधळ उडाला..मला वाटत पार्टि बारशासारखी असावी..का पार्टि म्हणजे डाॅक्टर काकूने टूच करायचा कार्यक्रम कि कायं.. का हि लोकं आत्ता पासून मला शाळेतं तरं पाठवणारं नाहित ना.. एक ना अनेक प्रश्न मला पडू लागले.. आणि कधी नाहि ती भिती वाटू लागली..
एके दिवशी माझ्यासाठी नवे शुज टोपी आणि जीन्स आणली गेली आणि वाटलं..चला टुच करण्याचा तरी हा कार्यक्रम नाहि..तरी पण शाळेचा डाऊट अजून बाकि होताच!
शेवटि तो दिवसं उजाडला..पण बाबा न्यायला आले नव्हते़..संध्याकाळी आईने गाडी बोलवली अन आम्ही दोघे निघालो..वाटेत अर्नवदादा सान्वीदिदि ला पन घेतले..ते पण मस्त मस्त ड्रेस घालून आले होते आणि दंगा करतं होते...कुणीतरी डान्स विषयी बोलत होते...चला म्हणजे पार्टि म्हणजे काहितरी गम्मत असावी..मी पण मज्जा करणार..डान्स करणारं..याहूूू!!!!!
आज पहिल्यांदा मला गाडित पुढे बसवले होते..त्यामुळे खुप मज्जा आली..रस्त्यावर गाड्या लाईट आवाज.. काय बघु नि का़य नको अस झालं..एवढ्या सगळ्यात मला झोप आली अन मी आईच्या मांडीवर ताणून दिली..
ऊठून बघतो तर काय समोर चक्क बाबा!! त्याने मला उचलले अन काहि तरी दाखवायला लागला..समोर खुप खुप लोक वेगवेगळे कपडे घालून उभी होती..काहि लोकांनी तर तोंडावर काहितरी विचित्र लावले होते..बाबा मला आता आत घेऊन गेला..आणि आत बघतो तर काय अंधार गुडूप्प!!! बाबा आईच काय मला माझ्या हातातलं खेळणं पण दिसेना..इतका अंधार तर रात्रीपण नसतो माझ्या रूममध्ये.. :(((((
मला खुप खुप भिती वाटू लागली..बाबा काहितरी दाखवू लागला ,आई काहितरी गाणं म्हणत होती पण छे मला काहिचं दिसेना.. मला कळेना हि लोकं लाईट लावायचं सोडुन असं वेड्यासारखं का करताहेतं..मी त्यांना समजावयाचा खुप प्रयत्न केला पण पुन्हा मला तिथेचं फिरवतं राहिले.. आईची तर कमालचं..चक्क मला दुध पाजायला लागली..आता मला सांगा भूक नसेल तर मी कसा पिणार????आता हळूहळू माझा पेश्नस संपायला लागले होते..ओरडून ओरडून सांगत होतो लाईट लावा लाईट पण कुणी ऐकल नाहि..आिण झालं आई बाबाने मला उचलून घरी आणले.
माझा सगळा मुड आॅफ झाला..आता मला सांगा त्या पार्टीतल्या डान्सफ्लोअर वर मला नेल असतं तरं लाईट नसती का दिसली??? आणि मला डान्स पन करायला मिळाला असता ;))) कधी कळणारं या लोकांना देव जाने!!!



Friday, November 9, 2012

BRB!!! (अर्थात हा मी आलोच!)

आता थोडे दिवसं माझ्या फॅन्सना वाट बघावी लागेल.. कारण मी आजी आजोबांकडे जात आहे..दिवाळी आणि बारशासाठि!
शेवटि एकदाचं मला फायनल नाव मिळणारं...आणि दिवाळीपण बघायला मिळणारं.. मी जाम खुश आहे!!
कालचं आईने माझ्यासाठि नवीन शेरवानी आणली आहे..फोटोपण काढले मी झोपेत असताना:(
मी काहि आधी दिवाळी बघितली नाहि पण मस्त पणत्या, लाइटच्या माळा,खाऊ या वरून नक्कीच गणपती बाप्पा सारखं काहितरी असेलं असं वाटतं..मला कोणतीहि गोष्ट आवडली कि तिचे लाड लाड करायचे असतात पण घरच्याना मी दुसऱ्या कशाचे लाड केलेल बघवत नाहि..उगाचचं वेदू तोंडात घालू नकोस म्हणून ओरडतातं..आई तर कमालचं करते.. स्वतः खाऊ खाते अन मी मागितला कि दातं नाहित दात नाहित असंकाहितरी म्हणत राहते..नेक्स्ट टाइम डॅाक्टर काकूला विचारतोच खर काय ते!
चलो जातो आईला सामान भरायला मदतं करायला हवी नाहि तर ती काहितरी विसरेलं!
सगळ्यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!!!

!!!!!HAPPY DIWALI!!!!



Thursday, November 8, 2012

wowwwww!!!!

It's surprising...I never tested this one!!...mommy u kept this toy out of ma reach ;(((((

आई-बाबा सांगा कोणाचे..

बाबा सांगा कोणाचे..
मला वाटायचे बाबा फक्त माझ्या आईचे..
आई सांगा कोणाची..
मला वाटायचे आई तर फक्त माझ्या बाबांची..
दोघंाच्यात होते माझ्यावरून लठ्ठालठ्ठी..
आज मला आहे सांगायची!

आई माझ्याबरोबर असते २४तास अन्
बाबाला होतो या गोष्टिचा त्रास!
रात्री बाबा उशिरा येतो ..
अन आईच्या कुशीतून मला ओढून घेतो...
माझ्या प्रत्येक ओरखड्यावर असते त्याची बारिक नजर..
आणि कारण सांगायला आई असते नेहमी हजर!

बाबाला माझ्या औषधांची काळजी फार अन् आईला वाटतो तो आहे केमीकल्सचा मार..
बाबा आहे माझा स्वछतेचा भोक्ता..
अन आईला देतो माझ्या आहाराचा तक्ता..
सारे करताकरता आईच्या येते नाकिनऊ...
म्हणते पुरे झाले आता बाळाला अंकगणित शिकवु...
बाबा तिला चोरून मला टिव्हि दाखवतो आणि आईन रागवलं कि म्हणतो वेदूला डिस्कवरीवर प्राणी दाखवतो!!

पण मला बरं वाटतं नसलं कि दोघे एक होतात.. अन् एकदमचं मला आपल्या कुशीत घेतात..
आई औषध देते अन बाबा गोष्टि सांगतात..
आता बरं वाटेलं याला..दोघ एकमेकांना समजावतातं!!

बाब करतात लाडं अन् आई काळजी करते..
मग मला वाटतं आई बाबा आहेत..
फक्त नि फक्त या वेदूचे!!

Saturday, November 3, 2012

माझी आई आणि तिची फजीती...

हा लेख माझ्या बाबांच्या अनुभवावरून लिहीत आहे.. त्यांना लिहील्यावर खुप आनंद होइल...so dad.. this is for you!!
तर झालं असं कि माझी आई फार कंजूस आहे आणि याच््या एकदम उलटा माझा बाबा...आज दोघं दिवाळीच्या खरेदिला गेले होते..नेहमी प्रमाणे मला घरीच ठेवलं..:((((( लक्ष्मी रोडला जा़यच म्हणून दोघं रिक्षाने गेले..दोघ येईपर्यंत मी झोपुन घेतलं..उठलो तर बाबा तनतनत होता आणि आई हसत.. मला काहि कळेचना.. शेवटि माझं नेहमीचं हत्यार काढलं..आणि भोंगा पसरला..बाबा लगेच पळतं आला आणि मला उचलले.. राग गेलेला नव्हता वाटतं so माझ्या बरोबर पण त्याने आईचा किस्सा शेअर केला..
झालं असं ..जाताना रिक्षाचं भाडं झालं ८० रू आणि येतीना झालं ९०रू..या वरून आई िरक्षावाल्या काकाशी बाबाच्याभाषेत कचाकच भांडली...
बाबा शांतपणे ते बघत होता आणि िरक्षावालेकाका आईला समजावण्याचा प्रयत्न करत होते.पण आई काहि माना़यला त़यार होइना..
आई आता नियमावर आली आणि रि.काकाना मीटरकार्ड दाखवायला सांगितले..बाबा जाम पिडले होते..हातात शॅापिंगच्या पिशव्या त्यांच्या रागात भर घालत होत्या...
मंीटरकार्डचे नाव काढता रि.काका नाराज झाले अन आईला वाटलं चला आता मी िजंकले..
काकांनी शांतपणे कार्ड काढलं आणि आईच्या हातात ठेवलं..अन आईलाचं उलट विचारलं..तुम्हिच सांगा किती झाले..आईने चेक केले तर आईचा विश्वासचं बसेना..चक्क ९२रु झाले होते..सांगितलेल्या भाड्यापेक्षा २रु जास्त..काका आता इरेला पेटले होते..ते आईच्या मागेच लागले..किती झाले ते सांगा...मग काय ..आईने गप्प ९०रू दिले आणि बाबाच्या मागून गप्प घरी आली...

तर अशी झाली आईची फजिती..moral of the story..बाबांसाठि..मला नेहमी बरोबर नेत जा म्हणजे कारनेच जाल किंवा रिक्षाने गेलं तरी आईचं लक्ष मीटरकडे न जाता माझ्याकडेचं असेलं..बरेबर ना मित्रांनो....

Thursday, November 1, 2012

माझं लग्न (बालविवाह..एक अनिष्ट परंपरा!)

आज लिहिण्याचं कारणं म्हणजे मला जाम टेंन्शन आलं आहे..मी ऐकलयं हल्लीचे आई बाबा मुलांच्या गोष्टित नाक घालत नाहित (गर्लफ्रेंडबाबतीत तर नाहिच नाहि!) पण माझ्याबाबतीत जरा वेगळं आहे...मी आईच्या पोटात असल्यापासुन चक्क माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली...
त्याचं काय आहे ना..माझा एक काका आहे...योगेश काका!त्याची आणि बाबाची खुप घट्ट गट्टी आहे...आिण आवड सुध्दा सेम टु सेम...अगदि िटव्हि पासुन क्रिकेट पर्यंत! so..दोघांनी ठरवलंय माझं लग्न काकाच्या मुलीबरोबर करायचं!!म्हणजे त्यांना नेहमी एकत्र राहता येइल!!
पण आईला काका आवडत नाहि वाटतं...तो आणि बाबा तिला सारखे चिडवतात...िबचारी नेहाकाकू पण पिडलेली असते..
पण मला कळतं नाहि मला न िवचारता हे लोकं कसं काय माझं लग्न ठरवू शकतात...जामचं टेंन्शन येतं..पण नेहाकाकू कडे बघून थोडं कमी होतं ..atleast लुकतरी चांगला असेलं...
आई सारखी म्हणतं असते..काकूला मुलगा होवुदे किंवा आईला मुलगी..म्हणजे त्यांचा बेत फसेल!

आता बाहेर आलं कि मलाचं सगळं हँडल करावं लागेलं असं दिसतंयं...

नावाचं कन्फ्युजन (इशू पासून युवराजपर्यंत)

मला समजतं नाहि या मोठ्या मानसांना लवकरं काहि decide का करता येतं नाहि...
आता माझ्या नावाचचं बघा..आई मला इशू म्हणते ( developer आहे ना त्यामुळे दुसरं काहि सुचतं नसावं..)तरी बरं बगं म्हणत नाही! बाबा ढमु म्हणतो..काका मँाटि आणि एक आजी माऊ आणि दुसरी सोनू म्हणते...माझा बाबाचं शिवाजीराजां सारखं नाक आहे..म्हणून त्याला त्याच्या आ़ोफिसमधले राजे आणि मला युवराज म्हणतात...
आता माझ्यासारख्या ५ महिन्याच्या बाळाने किती लक्षात ठेवायचं!!!!आणि मेन म्हणजे एकाने पण मला माझी चाॅइस विचारली नाहि.. so..मी ठरवलंयं माझं नावं फायनलं होईपर्यंत कोणी काहि बोलावलेतरी लक्षचं द्यायचं नाहि!!!

Wednesday, October 31, 2012

मी आलोयं.....

शेवटी तो दिवस आला...डॅाक्टर काका माझ्या बाहेर येण्याविषयी आई बाबाशी बोलत होते...ते ऐकुन मला खुप आनंद झाला...मी आनंदाने उड्या मारू लागलो..आणि आईच्या पोटात पुन्हा दुखु लागलं...

सगळेजन हॅास्पिटल मध्ये आईला घेउन गेले...तिथे बाबा आईला काहितरी समजावत होते..आणि माझ्या दोन्ही आज्जा नेहमीप्रमाणे गप्पा मारत होत्या...बराच वेळ झाला...आणि मी कंटाळून झोपी गेलो...

दुपारी ११.१५ ला मला जाग आली ...पाहतो तर काय..हुऱंृरै...मी आईच्या पोटातुन डा़यरेक्ट आजीच्या मांडिवर आलो.....yohhhhhhh world rockstar is here!!!

Friday, October 26, 2012

Here is our hero with his loved ones....needless to tell he just enjoy clickings!!!

To my litle one...


I am not the best mom... The greatest. I am not perfect. I am not superwoman.

I will fail. And make do. And play catch up. And sometimes I will miss out.

but I am trying..

Love,
your mommy