Sunday, December 9, 2012

माझी पहिली पार्टि..(take it LIGHTLY..)

आपण पार्टिला जायचे..पार्टिला जायचे असं आईकडून बरेचं वेळा ऐकलं पण पार्टि म्हणजे नेमकं काय हे काहि कळेचना..बरं पार्टित काय काय असणारं हे पण हि लोकं बोलेनातं..त्यामुळे माझा एकदम गोंधळ उडाला..मला वाटत पार्टि बारशासारखी असावी..का पार्टि म्हणजे डाॅक्टर काकूने टूच करायचा कार्यक्रम कि कायं.. का हि लोकं आत्ता पासून मला शाळेतं तरं पाठवणारं नाहित ना.. एक ना अनेक प्रश्न मला पडू लागले.. आणि कधी नाहि ती भिती वाटू लागली..
एके दिवशी माझ्यासाठी नवे शुज टोपी आणि जीन्स आणली गेली आणि वाटलं..चला टुच करण्याचा तरी हा कार्यक्रम नाहि..तरी पण शाळेचा डाऊट अजून बाकि होताच!
शेवटि तो दिवसं उजाडला..पण बाबा न्यायला आले नव्हते़..संध्याकाळी आईने गाडी बोलवली अन आम्ही दोघे निघालो..वाटेत अर्नवदादा सान्वीदिदि ला पन घेतले..ते पण मस्त मस्त ड्रेस घालून आले होते आणि दंगा करतं होते...कुणीतरी डान्स विषयी बोलत होते...चला म्हणजे पार्टि म्हणजे काहितरी गम्मत असावी..मी पण मज्जा करणार..डान्स करणारं..याहूूू!!!!!
आज पहिल्यांदा मला गाडित पुढे बसवले होते..त्यामुळे खुप मज्जा आली..रस्त्यावर गाड्या लाईट आवाज.. काय बघु नि का़य नको अस झालं..एवढ्या सगळ्यात मला झोप आली अन मी आईच्या मांडीवर ताणून दिली..
ऊठून बघतो तर काय समोर चक्क बाबा!! त्याने मला उचलले अन काहि तरी दाखवायला लागला..समोर खुप खुप लोक वेगवेगळे कपडे घालून उभी होती..काहि लोकांनी तर तोंडावर काहितरी विचित्र लावले होते..बाबा मला आता आत घेऊन गेला..आणि आत बघतो तर काय अंधार गुडूप्प!!! बाबा आईच काय मला माझ्या हातातलं खेळणं पण दिसेना..इतका अंधार तर रात्रीपण नसतो माझ्या रूममध्ये.. :(((((
मला खुप खुप भिती वाटू लागली..बाबा काहितरी दाखवू लागला ,आई काहितरी गाणं म्हणत होती पण छे मला काहिचं दिसेना.. मला कळेना हि लोकं लाईट लावायचं सोडुन असं वेड्यासारखं का करताहेतं..मी त्यांना समजावयाचा खुप प्रयत्न केला पण पुन्हा मला तिथेचं फिरवतं राहिले.. आईची तर कमालचं..चक्क मला दुध पाजायला लागली..आता मला सांगा भूक नसेल तर मी कसा पिणार????आता हळूहळू माझा पेश्नस संपायला लागले होते..ओरडून ओरडून सांगत होतो लाईट लावा लाईट पण कुणी ऐकल नाहि..आिण झालं आई बाबाने मला उचलून घरी आणले.
माझा सगळा मुड आॅफ झाला..आता मला सांगा त्या पार्टीतल्या डान्सफ्लोअर वर मला नेल असतं तरं लाईट नसती का दिसली??? आणि मला डान्स पन करायला मिळाला असता ;))) कधी कळणारं या लोकांना देव जाने!!!



No comments:

Post a Comment